'यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६' मराठी युवा उद्योजक रुपेश कोलते यांना जाहीर

'यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६' मराठी युवा उद्योजक रुपेश कोलते यांना जाहीर

मुंबई

 

     यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्याकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा “यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2026” यंदा मराठी युवा उद्योजक रुपेश चंद्रकांत कोलते यांना जाहीर झाला आहे. श्री. स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर या नावाने व्यवसाय करणाऱ्या रुपेश कोलते यांनी शून्यातून सुरुवात करून प्रामाणिकपणा, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेल्या यशाची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.“हा सन्मान फक्त माझा नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा, साथ देणाऱ्या प्रत्येक मित्राचा आणि प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे,” अशी भावना रुपेश कोलते यांनी व्यक्त केली.रुपेश कोलते हे व्यवसायाकडे 60% व्यवसाय आणि 40% सामाजिक बांधिलकी या तत्त्वावर पाहतात. सोलर स्ट्रीट लाईट या क्षेत्रात ग्रामीण भागात तसेच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करत लोकांपर्यंत सौर ऊर्जेचा संदेश पोहोचवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.मराठी तरुणांनी व्यवसायात उतरावे, एकमेकांना सहकार्य करावे आणि स्वतःबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जावे, हा संदेश देत ते कार्यरत आहेत. या सामाजिक भावनेतून केलेल्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा पुरस्कार आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा पुरस्कार असल्याचे कोलते यांनी सांगितले. “श्री. स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर हा फक्त व्यवसाय नाही, तो एक विश्वास आहे, एक नात आहे आणि त्या विश्वासाची आज मिळालेली ही सर्वात मोठी पावती आहे,” असे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे आभार मानताना रुपेश कोलते म्हणाले, “पुढील काळातही याच जिद्दीने, याच प्रामाणिकपणाने आणि अधिक उंच ध्येय ठेवून काम करत राहणार. आपला विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम राहू द्या.”