नेमळे येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी.
लॉरेन्स अँड मेयो आणि नेमळे ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने नेमळे ग्रामपंचायत हॉल मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायं 6.00 या वेळेत करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व नेत्र रुग्णांना डॉ. सौ नेहा राणे यांनी डोळ्यांच्या विविध आजाराविषयी माहिती दिली तसेच आपल्या डोळ्याची काळजी आपण कशाप्रकारे घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले या डोळ्यांच्या शिबिरामध्ये एकूण ५० हुन अधिक रुग्णांनी मशीन द्वारे डोळ्यांची तपासणी करून घेतली तसेच डोळ्याच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नेमळे ग्रामपंचायत उपसरपंच सखाराम राऊळ, राजा गवस, सचिन मुळीक, देवेंद्र परब, नेत्र चिकित्सक डॉ मयूर पारधी, सौ नेहा राणे, अभिजित सावंत, ओंकार ढवळे, उपस्थित होते.