महाराष्ट्र श्री २०२५ साठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ सज्ज. सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या वतीने निवड चाचणी पूर्ण

महाराष्ट्र बॉडीबिल्डर अससोसिएशन आयोजित 62वी महाराष्ट्र श्री 2025 या मानाच्या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या वतीने श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्हा निवड चाचणी संपन्न झाली. सदर निवड झालेला संघ पुढील प्रमाणे
1. प्रथमेश कातळकर - फिटनेस माणगाव 55 ते 60 किलो
2. रोहित कुरमुळे - एम फिट जिम कुडाळ 60 ते 65 किलो
3. ऋषिकेश कोडीयल - त्यागी फिटनेस सावंतवाडी 60 ते 65 किलो
4. श्री बाळा नार्वेकर -एम्पयर जिम कुडाळ 65 ते 70 किलो
5. श्री सलमान त्यागी - त्यागी फिटनेस सावंतवाडी 65 ते 70 किलो
6. श्री संदेश सावंत - बांदेश्वर फिटनेस बांदा 80 ते 85 किलो
तसेच संघव्यवस्थापक श्री सुधीर हळदणकर सर, सावंतवाडीसंघ प्रशिक्षक श्री अमोल तांडेल सर वेंगुर्ला यांची निवड करण्यात आली. निवड झालेला संघ हा उलवे तालुका उरण, जिल्हा रायगड येथे होणाऱ्या नमो चषक तसेच सी टी आर क्लासिक 2026 या राज्य स्पर्धासाठी सदर संघ निवड करण्यात आला. निवड समिती मध्ये श्री किशोर शांताराम सोन्सूरकर सर आंतरराष्ट्रीय पंच श्री अमोल विजय तांडेल, राज्य पंच श्री सुधीर रमाकांत हळदणकर राज्य पंच स्टेज मार्शल, श्री अंकित किशोर सोनसुरकर सर यांनी काम पहिले. निवड झालेल्या संघांचे अभिनंदन सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर्स अससोसिएशनचे अध्यक्ष श्री शंकर कांबळी, उपाध्यक्ष श्री जावेद शेख, श्री उमेश कोदे सर, खजिनदार श्री वसंत शेट्टी, सचिव श्री किशोर शांताराम सोन्सूरकर, श्री सातेरी व्यायाम शाळा संचालिका सौ अबोली किशोर सोन्सूरकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. या वेळेस श्री संतोष परब (सिंधुदुर्ग श्री विजेते) सौ हळदणकर मॅडम आदि उपस्थित होते. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉडी बिल्डर साठी विविध तालुक्यामध्ये स्पर्धा आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.