पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट.

मालवण.

  शहरात नगरपरिषद प्रशासनाचे स्वछतेबाबत नियोजन नाही, बायो टॉयलेट गाड्या वापराविना, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन, डास फवारणी बंद, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, फोकांडा पिंपळ येथील बंद फाउंटन, भाजी मार्केट तसेच मल्टीपर्पज हॉल काम बंद, मासे मार्केट वरील गाळे लिलाव नाही. अश्या स्वरूपात मालवण शहरातील विविध समस्या बाबत वारंवार सूचना करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने मालवण नगरीचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सविस्तर पणे तक्रार स्वरूपात पत्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देत चर्चा केली.
  दरम्यान, या बाबत पालकमंत्री यांनी योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करावी अशी मागणीही कांदळगावकर यांनी केली आहे.यावेळी यावेळी भाजप पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडवकर, माजी उपगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे आदी उपस्थित होते.
  मालवण नप मध्ये सध्या कार्यरत संतोष जिर्गे हे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच प्रशासक पदाचा कार्यभार आहे. आमचा नप मधील पाच वर्षांचा कार्यकाल 20 डिसेंबर 2021 ला संपलेला आहे. प्रशासकीय कार्यकाळाला आता एक वर्ष पूर्ण होत आलेल आहे. पण मागच्या वर्षभरात विकास कामे, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट व्यवस्था इत्यादी बाबत कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष होत चाललेला आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करून, लेखी देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. नप निवडणूका न झाल्याने अजूनही आमच्या कालावधीतील लोकप्रतिनिधी कडून लोकांच्या कामाच्या अपेक्षा आहेत. आणि आमची ती नैतिकता पण आहे. काम न झाल्यास ते अजूनही आम्हालाच जबाबदार धरणार आहेत. तरी खालील नमूद बाबतीत आणि एकंदरीत प्रशासकीय कारभाराबाबत माहिती घेऊन आपल्या स्तरावर आदेश होणेस विनंती आहे. असे पत्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सविस्तर दिले आहे.