आयनोडे हेवाळे येथील महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

आयनोडे हेवाळे येथील महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सिंधुदुर्ग.

    कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे त्यांच्या संयुक्त विद्यमाने १३ मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या मेळाव्यात ९४ महिला  सहभागी झाल्या होत्या.
यावेळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील, एडवोकेट सोनू गवस, उमेद क्लस्टर कोऑर्डिनेटर भंडारी उपस्थित होते.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेला हार अर्पण करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर शालेय मुलांचे स्वागत गीत झाले व व्यासपीठावरील सर्व विशेष अतिथींना गुलाब पुष्पदान त्यांचे स्वागत करण्यात आले.
   यावेळी महिला मेळाव्यामध्ये पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, उखाण्यांची स्पर्धा, व इतर कलागुणांना वाव मिळतील असे खेळ घेण्यात आले. त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये ॲड.सोनू गवस यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.  ॲड.सोनू गवस यांनी पुराण काळापासून शिवछत्रपतींच्या काळापर्यंत आज तगायत देश आणि समाज घडवण्यासाठी महिलांनी केलेले कार्य आणि महिलांची ओळख तसेच महिला संरक्षणाविषयी कायदे सुव्यवस्था याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाच्या शेवटी महिला मेळाव्यातील घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. विजय स्पर्धकांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.या महिला मेळाव्यासाठी सरपंच यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे हनुमंत गवस यांनी केले तर सरपंच साक्षी देसाई यांनी आभार व्यक्त केले.