आंबोली येथे १० ऑगस्टला मान्सून मॅरेथॉन स्पर्धा

आंबोली येथे १० ऑगस्टला मान्सून मॅरेथॉन स्पर्धा

 

आंबोली
 

      सह्याद्री एडवेंचर, सांगली ग्रुपच्या वतीने आंबोली येथे मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा १९ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. स्पर्धेची सुरुवात आंबोली येथील श्री देवी माऊली मंदिर, जकात वाडी येथून होणार आहे. निसर्गाच्या अद्भुत वातावरणात धावण्याचा अनुभव घेण्यासाठी ही स्पर्धा एक उत्तम संधी ठरणार आहे.या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. धावणे आणि निसर्ग यांचा संगम साधणारी ही मॅरेथॉन स्पर्धा सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी एक वेगळाच उत्साह आणि प्रेरणा देणारी ठरेल.