शरद प्रतिभाशाली प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पखवाज अलंकार महेश सावंत

कुडाळ
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाराम शेलार यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी त्यांना महाराष्ट्र कला भूषण तालमणी प्रताप पाटील यांच्या हस्ते मुंबई खारघर येथे संबंधित पत्र प्रदान करण्यात आले. या प्रतिष्ठान मार्फत संगीत, गायक, वादक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्वसामान्य कलाकारांना संघटित करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलेला वाव देणे, शासनाकडून मिळणारे लाभ मिळवून देणे, आपली कला या डिजिटल युगातसुद्धा चांगल्या प्रकारे प्रगत ठेवणे आणि भविष्यातसुद्धा चांगल्या प्रकारे ती कशी टिकून राहील याकडे विशेष लक्ष देणे या बाबींकडे विशेष लक्ष दिला जातो. यासाठीच तालुका निहाय अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा लाभ समस्त संगीत, गायक, वादक व सर्वसामान्य कलाकार या सर्वाना नक्कीच होईल असे सावंत यांनी व्यक्त केले. तसेच या नियुक्तीबद्दल त्यांनी आपले गुरुवर्य डॉ. दादा परब, भजनसम्राट बुवा भालचंद्र केळूसकर तसेच प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शेलार बुवा व समस्त प्रतिष्ठान परिवाराचे आभार मानले.