महाफिड स्पेशालिटी फर्टीलायझर कंपनीच्या वतीने खर्डेकर महविद्यालयाला संगणक व प्रिंटर मशीनचे वितरण.
वेंगुर्ला.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात महाफिड स्पेशालिटी फर्टीलायझरस इंडिया प्रा.लि.पुणे यांनी महाविद्यालयास कंपनीने दिलेल्या संगणक व प्रिंटर मशीनचे वितरण करण्यात आले.यामध्ये पाच कॉम्प्युटर आणि एक प्रिंटरचा समावेश आहे. यावेळी व्यासपीठावर महाफीड स्पेशालिटी फर्टिलायझरस इंडिया प्रा.लि.चे सांगली कोल्हापूर, कोकण विभागाचे क्षेत्रीय मॅनेजर तानाजी पवार, अच्युत श्रीराम प्रभूखानोलकर,संचालक समर्थ एंटरप्रायझेस वेगुर्ला सौ आदिती अच्युत प्रभूखानोलकर, सिंधुदुर्ग जिल्हा आंबा काजू बागायतदार संघटना अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, माजी प्राचार्य डॉ.आनंद बादेकर, प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले हे उपस्थित होते.
महाफीड ही उत्तम दर्जाची खते देणारी अग्रेसर कंपनी असून एन.पी.के खता बरोबर कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, सुक्ष्म अन्नद्रव्य (झिक, आयर्न, मॅगनीज, बोरॉन, कॉपर, माँलिबडिनम) आणि फेरस व झिंक इ.डी.टी.ए. चिलेट ही खते शंभर टक्के पाण्यात विरघळणारी फर्टीगेशन व फवारणीची खते उत्पादित करते ही खते बगीचा, रोपे व बागायतीसाठी उपयुक्त आहेत. जी महाविद्यालये शैक्षणिक गुणवत्ता राखण्यात यशस्वी झाली आहेत अशा महाविद्यालयाना आमची कंपनी व्यावसायिक व सामाजिक जबाबदारी फंडातून त्यांना मदत करते.ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमची महाफिड कंपनी आर्थिक हातभार लावते. महाफिड कंपनीचे मॅनॅजिग डायरेक्टर प्रविण पाटील याच्या मार्गदर्शनाखाली गेली २८ वर्षे ही कंपनी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थाना आर्थिक सहकार्य करत असते. आपण ज्या मातीत जन्मतो त्या मातीचे ऋण आपल्यावर असते. विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती करुन समाजाचे ऋण फेडावे असे महाफिडचे क्षेत्रीय मॅनेजर तानाजी पवार यांनी प्रतिपादन केले.
महाफिड ही कंपनी शेतीला आवश्यक असणारी रासायनिक खते निर्माण करणेत अग्रेसर असून या कंपनीची उत्पादने दर्जेदार आहेत असे जयप्रकाश चमणकर यांनी आपले मत व्यक्त केले. महाविद्यालयासाठी आंबा बागायतदार संघटना नेहमीच मदत करत असते.महाविद्यालयाच्या विकासासाठी आणखी मदतीची अपेक्षा असल्याचे डॉ.आनंद बांदेकर यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी. चौगले यांनी महाफिड या कंपनीने महाविद्यालयास दिलेल्या शैक्षणिक साहित्य संचाबदल आभार व्यक्त केले या साहित्य संचाचा-संगणकाचा वापर करुन विद्यार्थी आपली गुणवत्ता वाढवतील असा विश्वास दिला.
या कार्यक्रमात तानाजी पवार, सौ.आदिती प्रभूखानोलकर व डॉ.आनंद बांदेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी महाफिडचे सेल्स एक्झिक्युटीव्ह सचिन देशमुख, प्रॉडक्ट डेव्हलमेंट ऑफीसर श्री समर्थ मते, ॲड प्रकाश बोवलेकर सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बायातदार संघटना आणि रांजेद्र आरमारकर, शिवराम आरोलकर अनंत वायंगणकर सागर सागवेकर आदी आंबा बागायतकर व कृषि सहाय्यक लाडू जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास शिक्षणप्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.सौ.मंजिरी मोरे व पेट्रन कौन्सील मेंबर दौलतराव देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व आंबा बागायतदार उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.ए.के.बिराजदार यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.एस.कोंडेकर आणि सुत्रसंचालन प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी तर उपस्थिताचे आभार डॉ.बी.जी.गायकवाड यांनी मानले.