सावंतवाडी टर्मिनससाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : सागर नाणोसकर.

सावंतवाडी टर्मिनससाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : सागर नाणोसकर.

सावंतवाडी.

   कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजता सावंतवाडी टर्मिनस आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी होणाऱ्या रेल्वे स्थानक येथील लाक्षणिक उपोषणाला सर्व नागरिकांनी, विविध संस्था, संघटना, व्यापारी संघटना, रीक्षाचालक संघटना, वकिल - डॉक्टर संघटना तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी बांधव भगिनी आणि युवकांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना उपाध्यक्ष सागर सोमकांत नाणोसकर यांनी केले आहे.