खर्डेकर महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन
वेंगुर्ला
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागांतर्गत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन तुळस–काजरमळी येथे दि. १८ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.
या शिबिराचा मुख्य उद्देश शाश्वत विकासासाठी तरुणाईचा सक्रिय सहभाग वाढविणे हा असून, त्याअंतर्गत जलसंधारण व पडीक जमिनीचे पुनर्वसन, आरोग्य दक्षता, ग्रामस्वच्छता तसेच पर्यावरण संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या सात दिवसीय शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा तसेच प्रत्यक्ष श्रमदानाचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.या श्रमसंस्कार शिबिराचे नियोजन एन.एस.एस. विभागप्रमुख प्रा. के. आर. कांबळे यांच्यासह डॉ. धनश्री पाटील, प्रा. सावन राठोड, प्रा. विकास शिनगारे, डॉ. शिवकन्या तोडकर व प्रा. सौ. शुभदा माने यांनी केले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन परूळकर, तसेच ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

konkansamwad 
