सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेचे ८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग
बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बीड येथे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही आरोपी अद्याप अटक झालेला नसून सदर घटना राज्याच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेचा निषेध म्हणून तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेने ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांच्या या प्रकरणामुळे भावना दुखावल्या असून शासन स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही याबाबतची निवेदने पाठविण्यात आली आहेत या घटनेचा सरपंच संघटनेच्या झालेल्या एका बैठकीत निषेध नोंदवण्यात आला व त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी निवेदन सादर केले यावेळी कसाल सरपंच राजन परब, सरपंच संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता खोत झरेबाबर सरपंच अनिल शेटकर, मोरगाव सरपंच संतोष आईर, फुकेरी सरपंच निलेश आईर, बांदिवडे सरपंच अरविंद साटम पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण, येरवडे तर्फ मानगाव सरपंच श्रीया ठाकूर, सोनवडे तर्फ हवेली सरपंच नाजुका सावंत, कोळंब सरपंच श्रीया धुरी, आंबडोस सरपंच सुबोधनी परब, तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर, वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, साळेल सरपंच रवींद्र साळकर, देवबाग सरपंच आणि मालवण तालुका सचिव उल्हास तांडेल, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, मुटापुरी सरपंच बाळकृष्ण गावकर आदीसह उपस्थित होते.