रामेश्वर संस्थानच्या गणरायाला भावपूर्ण निरोप!

रामेश्वर संस्थानच्या गणरायाला भावपूर्ण निरोप!

 

आचरा 

 

      ३९ दिवस अखंड भक्ती, कीर्तन, भजन, फुगड्या आणि आनंदात रंगलेला श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव शनिवारी भक्तीच्या आणि भावनांच्या वातावरणात संपन्न झाला.सायंकाळी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया!” च्या नादात मिरवणूक मंदिरातून समुद्रकिनाऱ्याकडे रवाना झाली.ठिकठिकाणी रांगोळ्या, तोरणे, फुलांचा वर्षाव आणि मोदक-लाडूचा प्रसाद — या सर्वांनी संपूर्ण आचरा गाव भक्तिमय झाला होता. मावळत्या सूर्याच्या साक्षीने समुद्रकिनारी महाआरती करून भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.त्या क्षणी सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर एकच साद 
 “ _गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!_ ” 

     मिरवणुकीला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. जय भवानी म्युझिकल बँजो, बोरीवली स्वराज्य ढोल पथक आणि पिरावाडी महिला ढोलपथकाच्या तालावर भक्तीचा उत्सव दुमदुमला. सदर निवडणुकीसाठी पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी आढाव यांनीही उपस्थित राहून मिरवणुकीची पाहणी केली.

गणरायाच्या निरोपाने आचरा गाव भावनांनी भारावून गेले... भक्तीचा सोहळा संपला, पण हृदयात बाप्पाची आठवण कायम राहिली!