कोकण, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता.

कोकण, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता.

पुणे.

  राज्यातील विविध भागात शुक्रवारी अतिवृष्टीची नोंद झाली. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकण आणि विदर्भात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या दहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुनरागमन केले आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
   अरबी समुद्रात दगांची दाटी झाली असून राज्यातील पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे सर्वाधिक १७० मीलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, आज (२९ जून २०२४) रायगड, रत्नागिरी, पुणे या भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यमतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया चंद्रपूर, गडचिरोली येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला.
    हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशार देण्यात आला आहे. दुसरीकडं सिंधुदुर्गसह सातारा आणि मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.