नितेश राणे यांनी आज मत्स्य आणि बंदर विकासमंत्री खात्याचा पदभार स्वीकारला.

नितेश राणे यांनी आज मत्स्य आणि बंदर विकासमंत्री खात्याचा पदभार स्वीकारला.


मुंबई 
    मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात मत्स्य आणि बंदर विकास खात्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर खातेप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. राणे हे कणकवलीतून काल मुंबईला रवाना झाले होते. आज सकाळी त्यांनी मुंबईतील प्रभादेवी येथे जाऊन सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालयातील दालन क्र.२ मध्ये जाऊन पदभार स्वीकारला. तसेच मत्स्य आणि बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.