ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
मालवण.
ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर चिंदर सेवा संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज्यांची 394 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भगवंतगड शाळे पासून भगवंत गड किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिरात पर्यंत जय भवानी जय शिवाजीच्या गजरात आज शिवजयंती उत्सवाची सुरुवात झाली. सिद्धेश्वराची, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री तसेच भारतीय कॅरम महासंघ उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाळासाहेब गोसावी यांचा अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांचा तर मंडल अध्यक्ष अजय परब यांचा खजिनदार गणेश गोगटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच, पोलीस पाटील, इतर मान्यवर यांचा गुलाब पुष्प देऊन तर चिंदर गावातील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा चिंदर सेवा संघाच्या सेवकांन कडून शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मालवण पत्रकार संघटने कडून देण्यात येणारा कै.भाई साहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेल्या पत्रकार झुंझार पेडणेकर यांचाही चिंदर सेवा संघाच्यावतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना बाळासाहेब गोसावी म्हणाले कि चिंदर सेवा संघ करत असलेले काम कौतुकास्पद आहे. तसेच अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांनी चिंदर गावातील शिक्षकांचे अभिनंदन केले.
स्पर्धेच्या सुरुवातीला चिंदर सेवा संघांचे सहखजिनदार आशिष कोरगावकर यांनी अफझल खानाचा वध हा पोवाडा सादरीकरण करून शिवकालीन वातावरणाची निर्मिती केली.
स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडी प्रथम यांनी क्रमांक प्राप्त केला त्यांना सिंह गर्जना ग्रुप आचरा कडून 1111 व चिंदर सेवा संघा कडून चषक व प्रमाणपत्र, जिल्हा परिषद शाळा गावठणवाडी यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्यांना तुर्या ग्रुप ऑफ आर्ट्स - गणेश अपराज यांच्याकडून 777 रु तर चिंदर सेवा संघा कडून चषक व प्रमाणपत्र, जिल्हा परिषद शाळा सडेवाडी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला त्यांना तुर्या ग्रुप ऑफ आर्ट्स - गणेश अपराज यांच्याकडून 555 रु व चिंदर सेवा संघा कडून चषक व प्रमाणपत्र, तर जिल्हा परिषद शाळा कुंभारवाडी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. त्यांना तुर्या ग्रुप ऑफ आर्ट्स - गणेश अपराज यांच्याकडून 333 रु चिंदर सेवा संघा कडून चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषद शाळा पडेकाप यांनी धनगरी नृत्य सादर करत सर्वांची वाहवा मिळवली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नवनाथ भोळे व आशिष कोरगावकर यांनी काम पाहिले.यावेळी चिंदर सरपंच नम्रता महंकाळ-पालकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, गणेश गोगटे, सिद्धेश गोलतकर, भूषण दत्तदास, संतोष अपराज, विवेक परब, रोहन वराडकर, सदाशिव गोसावी, संतोष पालकर, प्रणित तावडे, संदीप परब, प्रिया पालकर, पिंट्या दळवी, श्रीकांत कानविंदे, श्रेया चिंदरकर, तलाठी- शेजवळ, संतोष जाधव, शिक्षक-पंढरीनाथ करवडकर स्मिता जोशी, माधुरी पाटील, राजेंद्र चौधरी, राजेंद्रप्रसाद गाड, गंगाराम पोटघन, रतन बुटे, नंदकुमार जुधळे, अमोल खेडेकर, प्रवीण तेली आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश गोलतकर यांनी सूत्रसंचालन भीमाशंकर शेतसंदी यांनी तर आभार मोरेश्वर गोसावी यांनी मानले.