दोडामार्ग भेडशी येथे बाबा टोपले मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेचे आयोजन.

दोडामार्ग
दिवाळी निमित्त बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने दोडामार्ग तालुका मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा 30 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठीक 7 ते 9 वाजेपर्यंत असून स्पर्धा बाबा टोपले यांच्या निवासस्थानी होणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांनी नागेश टोपले 7083358942 यांच्याशी 28 तारीख संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5555 रु, द्वितीय पारितोषिक 3333 रु, तृतीय पारितोषिक 2222 रु आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.