राज्यात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी; महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर.

राज्यात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी; महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर.

मुंबई.

   लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे प्राथामिक कल समोर आले आहेत. त्यानुसार, राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी तब्बल २८ जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर पडले असून त्यांच्याकडे केवळ १९ जागांचीच आघाडी आहे.
   तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा दबदबा पाहायला मिळत आहेत. सध्या राज्यात भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या १२ ते १३ उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसकडे ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ६ जागांची आघाडी आहे. शिवसेना शिंदे गटाचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. त्यांच्याकडे ५ जागांची आघाडी आहे. महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही त्यामुळे कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.