आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील कारला अपघात; दुचाकीस्वाराची धडक.

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील कारला अपघात; दुचाकीस्वाराची धडक.

नाशिक.

   नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा असून त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसून दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.
   आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून आज येवल्यामध्ये देखील त्यांची सभा पार पडली. त्याच वेळेस त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुचाकीस्वाराने मागून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. कारला मागून धडक दिल्याने कारची काच फुटली आणि दुचाकीस्वार जखमी झाला. मनमाड शहरात जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.