राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी प्रबोध जाधवची निवड.
वेंगुर्ला.
कोल्हापूर विभागीय कॅरम क्रीडा स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे झाल्या.या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला हायस्कूलचा आठवीचा विद्यार्थी प्रबोध सुनिल जाधव याची १४ वर्षे वयोगटातील कॅरम स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल त्याचे शाळेचे मुख्याध्यापक पी.डी. कांबळे, क्रीडा शिक्षक श्री.वाले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.