वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ व ४ डिसेंबर रोजी.

वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ व ४ डिसेंबर रोजी.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला पंचायत समिती व जिल्हा परिषद सिधुदुर्ग शिक्षण विभाग यांच्यावतीने ५१वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ व ४ डिसेंबर या कालावधीत वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
   ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती सहभाग नोंदणी, प्रदर्शन साहित्य मांडणी, लहान व मोठ्या गटात निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धा, दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लहान व मोठ्या गटात प्रश्नमंजूषा स्पर्धा व प्रतिकृती परिक्षण, दुपारी ३ वाजता गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व सहाय्यक गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण व समारोप होणार आहे. ३ डिसेंबर रोजी होणा-या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदिफमार कुडाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, वेतोरे सरपंच प्राची नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव पाटील, शिक्षण प्रसारक समितीचे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. तरी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मुख्याध्यापक संजय परब, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, शिक्षण विभाग कर्मचारी यांनी केले आहे.