सरपंच उदय पाळेकर यांनी स्वखर्चातून केली गावातील कामे.

सरपंच उदय पाळेकर यांनी स्वखर्चातून केली गावातील कामे.

देवगड.

  आपण समाजाचे देणे लागतो या उद्देशाने समाजासाठी थोडा हातभार लावण्याकरिता पाळेकरवाडी सरपंच यांनी स्वखर्चातून आपल्या गावातील काही कामे मार्गी लावली.शासनाकडून रोडची साफसफाई करणे उशिराने होत असल्यामुळे सरपंचांनी शासनाची वाट न पाहता स्वतः त्या कामाबाबत पुढाकार घेतला आणि काम पूर्णत्वास नेले.
   श्री.पाळेकर असे म्हणाले की गावाच्या हद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी झुडपे यांची साफसफाई करणे अत्यंत आवश्यक असते रोड ने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना त्याचा खूप त्रास होत होतो.
   यामध्ये त्यांनी मणचे ( कोणीचा चढाव ) ते पालेकरवाडी तीन तिठा पर्यंत, गणपती विसर्जनला जाणारा बंदराचा रस्ता, तीन तिठा ते वारीक वाडी रस्ता, तीन तिठा ते सड्या पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे वाढीव गवत कटरच्या सहाय्याने कापले. ही सर्व अत्यावश्यक असणारी कामे पाळेकर यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने केली. तसेच पाळेकर वाडी तिठा येथे प्रवासी शेड तुटलेल्या अवस्थेत होती त्याचे तुटलेले सिमेंट पत्रे व त्याला रंगरंगोटी सुद्धा केली आहे.त्यांच्या या कार्याचे गावातून कौतुक होत आहे.