झोळंबे येथील 'दत्तप्रसाद भजन मंडळ' निर्मित अभंग संग्रहाचे प्रकाशन.

झोळंबे येथील 'दत्तप्रसाद भजन मंडळ' निर्मित अभंग संग्रहाचे प्रकाशन.

दोडामार्ग.

     झोळंबे येथील सुमारे सात दशकाहून अधिक वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या 'दत्तप्रसाद भजन मंडळ' निर्मित अभंग संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून या अभंग संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
   झोळंबे येथील एन. डी. गवस यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर मंडळाचे जेष्ठ गायक शिवराम गावडे, एन. डी. गवस, रमेश गवस, आनंद गवस, शंकर गवस, सिताराम गावडे, संदिप गवस, गणेश प्रसाद गवस, सुधाकर गवस, गणेशप्रसाद गवस व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
   सन १९५३ मध्ये (कै.) दत्ताराम ऊर्फ गोपी रामा गवस यांनी दत्तप्रसाद भजन मंडळाची स्थापन केली. या भजन मंडळाला सुमारे ७० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी अतिशय कठीण परीस्थितीत या मंडळाच्या सहकाऱ्यांनी तळर्ण (गोवा) येथील संगीत शिक्षकांकडे भजनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेवून या भजन मंडळाने पाया रचला. त्यावेळच्या अभंगांचा नव्या पिढीस उपयोग व्हावा तसेच दिशा देण्याच्या निमित्ताने मंडळाच्या विद्यमान कलाकारांनी ही अभंग संग्रह पुस्तिका तयार केली. यावेळी जेष्ठ गायक शिवराम गावडे यांचा एन डी गवस यांच्याहस्ते चांदीची गणेश मुर्ती, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या आजपर्यंतच्या कार्यकाळातील आठवणी व अनुभव व्यक्त करून मंडळाच्या स्तुत्य उपक्रमास व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संदिप गवस यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच मंडळाच्या स्थापनेपासुनच्या कार्याचा आढावा घेत आतापर्यंत मंडळातील ज्या व्यक्तीनी आपले योगदान दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
   या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश गवस यांनी प्रास्ताविक संदिप गवस यानी तर आभार राजेश गवस यांनी मानले.