सिंधुदुर्ग विद्या निकेतनचा गणितात १००% झेंडा !

सिंधुदुर्ग विद्या निकेतनचा गणितात १००%  झेंडा !

 

वेंगुर्ला 


        सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत वेंगुर्ल्यातील सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल ने १००% यश मिळवून आपला झेंडा उंच फडकवला आहे


 इयत्ता पाचवीतून
     १२ विद्यार्थी प्रविष्ट — त्यापैकी ११ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर १ विद्यार्थ्याला द्वितीय श्रेणी 


 इयत्ता आठवीतून
      दुर्वांक रामचंद्र मालवणकर आणि अथर्व उत्तम तोडकर यांनी प्रत्येकी ९८ गुणांसह वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला या चमकदार यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री. इर्शाद शेख, संचालक श्री. प्रशांत नेरुकर, सचिव श्री. दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका सौ. मनिषा डिसोजा तसेच सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.