राज्यस्तरीय ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला दोन पदके.

राज्यस्तरीय ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला दोन पदके.

रत्नागिरी.

    महाराष्ट्र स्टेट ओपन तायकॉन्दो चॅम्पियनशिप 2024 रॉयल हॉल, रत्नागिरी एमआयडीसी येथे मोठ्या दिमाखात पार पडली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 700 खेळाडू सहभागी झाले होते.  रत्नागिरीमधील एस आर के  तायकॉन्दो क्लबची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिने फ्री स्टाईल पुमसे प्रकारात कास्य पदक तर वैयक्तिक पुमसे प्रकारात रौप्य पदकाची कमाई करून आपल्या नावावर एकूण दोन पदकांची नोंद केली.
   स्वरा हिला एस आर के  तायकॉन्दो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे मार्गदर्शन लाभले, स्वरा ही इयत्ता 5 वी मध्ये शिकत असून शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, गणराज, जय भैरी, एस.आर. के, तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.