गोपुरी आश्रम येथे उद्या दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

गोपुरी आश्रम येथे उद्या दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

कणकवली.

   ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने तालुक्यातील एकता दिव्यांग विकास संस्थेच्यावतीने गोपुरी आश्रम या ठिकाणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यात शालेय विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण व्हावे, समाजामध्ये दिव्यांगांविषयी आपलेपणा निर्माण होण्यासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकास पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांच्यावतीने करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेचे विषय- जागतिक दिव्यांग दिन, दिव्यांग व्यक्तींबद्दल समाजाचा दृष्टिकोन असे आहेत. तर चित्रकला स्पर्धेचे विषय- निसर्ग चित्र असून स्पर्धेसाठी कागद, रंग, पट्टी, पेन्सिल व पेन संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी दिव्यांग व्यक्तींना रोजगाराबाबत मोफत मार्गदर्शन, गरजू दिव्यांगांना योजनांचे अर्ज वाटप देखील करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांची वधु-वर नावनोंदणी करण्यात येणार आहे. तरी दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थाध्यक्ष सुनील सावंत (९४२०६५४६२४), सचिव सचिन सादये यांच्याशी संपर्क साधावा.