झाराप येथे बालदिन उत्साहात साजरा.

झाराप येथे बालदिन उत्साहात साजरा.

कुडाळ.

   निरागस्ता,खळखळता उत्साह,कायम उत्सुकता आणि अद्भुततेचे वेड याने बालपण भारावलेले असते.या गुणावर शाबासकीची थाप  देण्यासाठी, लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बालदिन साजरा केला जातो मात्र "रोजचा दिन" हा बालदिन होण्याची गरज असल्याचे मत झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांनी व्यक्त केले.
   भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त झाराप येथे मंगळवार १४ रोजी  झाराप ग्रामपंचायतच्या वतीने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.चिमुकल्यांना झारापवासीयांनी खास शुभेच्छा दिल्या.