सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वक्तृत्व स्पर्धेत सुयश

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वक्तृत्व स्पर्धेत सुयश


वेंगुर्ला 
    शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला द्वारे दि. १० व ११ डिसेंबर २०२४ या कालावधी मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेची इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कु.सोनाक्षी समीर तेंडोलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.तीच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तीचे अभिनंदन केले.