तिरोडा युवक मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

तिरोडा युवक मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

वेंगुर्ला.

   आई देवी माऊली तिरोडा युवक मित्र मंडळ आयोजित माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर पुरस्कृत भव्य ओवर आर्म क्रिकेट स्पर्धेचे तिरोडा येथे आयोजन करण्यात आले होते. त्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून उपरकर समर्थक प्रसाद गावडे आशिष सुभेदार, राजेश टंगसाळे,शुभम सावंत, मनोज कांबळी, मंदार नाईक, पंकज पेडणेकर, दादा पालकर, ओमकार गावडे, विजय गावडे, हर्षद केरकर उपस्थित होते.आज बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये एड्रीयल स्पोर्ट्स संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.तसेच माऊ स्पोर्ट्स यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले.उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी आयोजक मनोज कांबळी,पंकज पेडणेकर,ओमकार गावडे,विजय उर्फ अण्णा गावडे, दादा पालकर, हर्षद केरकर, अनिकेत पटेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच पुढील वर्षी परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून अजून भव्य दिव्य अशी तिरोडा गाव मर्यादित स्पर्धा भरवण्यात येतील असे जाहीर केले.माजी आमदार उपरकर तसेच आयोजन केलेल्या सर्व सहकारी मित्रांचे मंदार नाईक यांनी आभार मानले.