भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालकडून निवृत्तीची घोषणा
दिल्ली
भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालने गुरुवारी (24 ऑक्टोबर) निवृत्तीची घोषणा केली आहे. हरियाणातील एका छोट्या शहरातून आलेल्या राणी रामपालच करियर 16 वर्षांच राहिल. अत्यंत गरिबीत असताना तिने आपले करिअर सुरू केले होते, तिचे वडील हातगाडी ओढण्याच काम करायचे.29 वर्षीय राणी रामपाल भारताच्या सर्वोत्तम हॉकी खेळाडूंपैकी एक आहे.तिने ऑलिंपिक 2021 मध्ये भारतीय टीमच प्रतिनिधित्व केल होत. यावेळी ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला.नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर भारत-जर्मनी द्विपक्षीय कसोटी मालिकेनंतर राणी रामपालने आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा केली. राणी रामपाल अशा प्रकारे खेळाच्या मैदानावरच निवृत्तीची घोषणा करणारी पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू ठरली.आतापर्यंत 254 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या राणी रामपालने निवृत्ती जाहीर करताना यापुढील काळात उद्योन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचही नमूद केलं. राणी रामपालला जेएसडब्ल्यूने त्यांच्या सूराम हॉकी क्लबसाठी साइन केले आहे. सूराम हॉकी क्लब आगामी हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी होणार आहे.भारतात पहिल्यांदाच महिला व्यावसायिक हॉकी लीग होणार आहे.