सावंतवाडी येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायफल सुरक्षा दलाचे संचलन.

सावंतवाडी.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने सावंतवाडी शहरात त्रिपुरा रायफल सुरक्षा दलाच्या ८२ जवानांनी संचलन केले. सावंतवाडी जनरल जगंन्नाथराव भोसले शिव उद्यान ते बाजारपेठेतून एसटी स्टॅण्ड या मार्गावर हा रूट मार्च काढण्यात आला. यात सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या समवेत ३ पोलीस अधिकारी श्रीकांत इंगवले, महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक, पोलीस उपनिरीक्षक दळवी यांच्यासह त्रिपुरा रायफल सुरक्षा जवानांसमवेत त्या दलाच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश होता.