सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५% अनुदान मंजूर

सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५% अनुदान मंजूर

 


सिंधुदुर्गनगरी
      मदार दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५% अनुदान शासनाकडून मंजूर करण्यात आले व उर्वरित २५% कर्ज जिल्हा बँकेकडून देण्यात आले होते. अनुदान मिळेपर्यंत संपूर्ण कर्ज रक्कम जिल्हा बँकेने विनातारण १५ नाट्यमंडळांना मंजूर केली होती, त्यापैकी ९ वाहने जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत करण्यात आली आहेत.या ९ दशावतार नाट्यमंडळांच्या मालकांकडे वाहनांच्या चाव्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे सुपूर्द करण्यात आल्या. 
     यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, प्रकाश बोडस, रविंद्र मंडगावकर, महेश सारंग, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सिंधूरत्नचे डॉ. आनंद तेंडुलकर, जिल्हा परिषद अधिकारी महोदव शिंगाडे, भालचंद्र माळवदे, बँकेचे अधिकारी व कर्मचारी आणि दशावतार नाट्यमंडळाचे मालक व कलाकार उपस्थित होते. बँकेने केलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील नाट्यमंडळांना नवीन वाहने उपलब्ध होऊ शकली, याबद्दल नाट्यमंडळांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे तसेच अनुदान बद्दल आमदार दिपक केसरकर व शासनाचे आभार मानले.यावेळी वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ, मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट्य मंडळ आणि खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ या दशावतार नाट्यमंडळाना वाहने सुपूर्द करण्यात आली.