नांदगाव येथील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडणार : सुशांत नाईक
कणकवली
कणकवली नांदगाव दशक्रोशीतील विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांची ऐन सणासुदीला गैरसोय होत आहे. अनेक वेळा मागणी करून सुद्धा देखील मागण्या पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्रामस्थांनी महावितरण ला जुने मोडकळीस आलेले पोल बदला, कमी कार्यक्षमतेचे ट्रान्सफार्मर बदलून जास्त कार्यक्षमतेचे ट्रान्सफार्मर बसवा, 33kv ची लाईन नांदगाव ला कणकवलीतुन गेलेली आहे तिला पर्यायी लाईन ची व्यवस्था करा, पिन इंसोलेटर बदला, ज्या ठिकाणी सिंगल फेज लाईन आहेत त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार थ्री फेज लाईन टाकावी, शेतजमिनीतुन जाणाऱ्या विजेच्या तारांना स्पेसर लावण्यात यावीत जेणे करून लाईट तुटून होणारे अपघात टाळता येथील व सणासुदीला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा अश्या अनेक मागण्या नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केल्या आहेत. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना दिला.