तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना.

सिंधुदुर्ग.
महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदाची परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने अर्जदार यांच्या प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राच्या माहितीबाबत तसेच त्यांना येणाऱ्या इतर अडचणीकरीता परीक्षेच्या तारखेनुसार तसेच सुट्टीच्या दिवशी पुढीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
नाव पदनाम व दूरध्वनी नंबर, मोबाईल क्रमांक निहाय पुढीलप्रमाणे- श्रीधर पाटील, तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग 02362-229000 मो. क्र. 7588065694 विजय वरक, नायब तहसिलदार, मो. क्र. 9423236054, अनिल पवार,अव्वल कारकून, मो क्र. 9422373729, एम.ए. पाटकर,अव्वल कारकून, मो. क्र.9730093801, एस.एल. गाड, महसूल सहायक, मो क्र. 9834915332, एस.बी. देसाई महसूल सहायक, मो क्र. 9370363453 या क्रमांकावर संपर्क साधावा.