दशावतारी लोककलावंतांच्या संघटनेसाठी शिवसेनेकडून एक लाखाची मदत

दशावतारी लोककलावंतांच्या संघटनेसाठी शिवसेनेकडून एक लाखाची मदत

 

मालवण

 

  दशावतार कलाकारांच्या संघटनेसाठी शिवसेनेच्यावतीने एक लाखाची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार निलेश राणे यांच्यावतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते सदरची मदत मालवण तालुक्यातील घुमडे येथील घुमडाई मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली.दशावतार कलाकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना निर्माण होत असल्याने या संघटनेला जिल्ह्यातील सर्व सभासद सहभागी होण्यासाठी आणि संघटनेचे काम वाढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सदरची मदत देण्यात आली आहे.यावेळी दशावतार कलाकारांच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला तसेच मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.