प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थींचा ‘ई’ गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न.

वेंगुर्ला.
ग्रामपंचायत परुळे बाजार येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थींना घराच्या चाव्या देत ‘ई’ गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, नमिता परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे, यांच्यासह घरकुल पूर्ण झालेले लाभार्थी उपस्थित होते.यावेळी त्यांना प्रतिकात्मक चावी आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले. यावेळी त्यांनी योजनेचा लाभ घेत मुदतीत घरकुल योजना पूर्ण केल्याबद्दल आभार मानले.