आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर यांनी ध्वजारोहणाचा मान दिला माजी सैनिकाना.

वेंगुर्ला.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सांगता सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.वेंगुर्ले तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचा यशस्वी विष्णू कोंडसकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सैनिक देऊ जगन्नाथ धर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.महिला सरपंचा असलेल्या सौ.कोंडसकर यांनी देशाप्रति प्रेम दाखवित त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.तसेच यावेळी शिलाफलकाचे अनावरणही माजी सैनिक उत्तम पुंडलिक पाटकर व सरपंचा यशस्वी कोंडसकर यांच्या हस्ते झाले.यावेळी ग्रा.पं. च्या वतीने देऊ धर्णे व उत्तम पाटकर यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दहावीत यश मिळविलेल्या सानिया डिचोलकर,भूषणा धर्णे, वृषाली परब,बारावीत यश मिळविलेल्या मंगल शेणई, आदित्य धर्णे, गौरवी दाभोलकर, जानवी सोनसुरकर तसेच हर्षदा धर्णे इत्यादींचा ग्रा.पं. मार्फत मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी,पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यामार्फत शैक्षणिक स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमास उपसरपंच परेश हळणकर, ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण, ग्रा.पं. सदस्य, सोमेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रकाश गडेकर, सोसायटीचे माजी चेअरमन समिर कुडाळकर, माजी सरपंचा समिधा कुडाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जयवंत धर्णे, सामाजिक कार्यकर्ते राजू सामंत, तलाठी श्री. ठाकूर, पोलिस पाटील संजना होडावडेकर, तात्या कोंडसकर, सत्यवान धर्णे, ग्रा.पं. कर्मचारी बबन धर्णे, मधुसूदन माळकर, संतोष धर्णे, प्रिया होडावडेकर, मदन धुरी, सोसायटी कर्मचारी,आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक,आरोग्यसेविका, आडेली शाळा नं.१, भंडारवाडी शाळा व आडेली हायस्कुलचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.यानंतर ग्रा.पं.नजीकच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.