मसूरे येथील पावणाई महिला बचतगटाच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी ५०० राख्या भेट. मालवण तहसीलदार यांच्याकडून बचत गटाच्या उपक्रमाचे कौतुक.

मसूरे येथील पावणाई महिला बचतगटाच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी ५०० राख्या भेट.  मालवण तहसीलदार यांच्याकडून बचत गटाच्या उपक्रमाचे कौतुक.

मालवण. 

     पावणाई स्वयंसहायता महिला बचत गट मसुरे गडघेरा बाजारपेठ या महिला बचत गटाच्या वतीने सीमेवरील सैनिकांना राखीतून मानवंदना देण्यासाठी बचत गटांने स्वतःतयार केलेल्या ५०० राख्या सीमेवरील सैनिकांसाठी भेट म्हणून मालवणच्या तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांच्याकडे सोमवारी सकाळी मालवण तहसीलदार कार्यालय येथे जाऊन या बचत गटाच्या सदस्या तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर आणि बचत गट सदस्य सौ विजेता पारकर यांनी सुपूर्द केल्यात.पावणाई  महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल मालवणच्या तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांनी बोलताना सांगितले की बचत गटांच्या माध्यमातून आज विविध उत्पादने घेऊन रोजगार निर्माण केला जातो परंतु त्या पुढे जाऊन  सामाजिक जाणीवेतून आणि वीर जवानांप्रति आदरभावना आणि प्रेम व्यक्त करणारा पावणाई महिला बचत गटाचा आजचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. मसूरे येथील हा बचत गट नेहमी समाजाभिमुख विविध उपक्रम राबवत असतो. या बचत गटाचे आज तालुक्यामध्ये खूप मोठे नाव आहे याबद्दल या बचत गटातील सर्व सदस्यांचे सुद्धा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   या महिला बचत गटामध्ये अध्यक्ष हेमलता दूखंडे, सचिव ज्योती पेडणेकर, नीलम दळवी, शितल मसुरकर, सुरेखा परब, मोनिका दुखंडे, मनीषा शिंदे, शाकीरा शेख, नूरजहा शेख या महिला कार्यरत असतात.