मठ कणकेवाडी शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात संपन्न

मठ कणकेवाडी शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात संपन्न


 

वेंगुर्ला 

 

     वेंगुर्ला येथील मठ कणकेवाडी शाळेमध्ये शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सवाने उत्साहात संपन्न झाला.यात सर्वप्रथम  शालेय परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली त्यानंतर नवागतांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरण करून खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जयश्री सकपाळ, मुख्याध्यापक वीरधवल परब, सहकारी शिक्षक रामा पोळजी, ईशा गावडे, सानिका सावंत, निशा राणे, पूजा सावंत, नामदेव सावंत, संतोष दाभोलकर, अंगणवाडी सेविका ज्योती परब, मदतनीस गावडे, प्रकाश भोई, राजश्री घोरपडे तसेच पालक ग्रामस्थ उपस्थित होते.