लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयांमध्ये फ्रेशर्स पार्टी साजरी

लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयांमध्ये  फ्रेशर्स पार्टी साजरी

 

सावंतवाडी

 

      सावंतवाडी येथे बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी पार पडली. यावेळी लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांनी केले. यावेळी केळुसकर यांनी विद्यार्थ्यांना संस्थेची माहिती दिली. "लोकमान्य ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ किरण ठाकूर यांनी हे महाविद्यालय सुरू करून व्यवस्थापनाचे पदवीचे दालन सुरु केले असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना चांगली नोकरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला". असे श्री. केळुसकर म्हणाले. महाविद्यालयातील द्वितीय श्रेणीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे व्यवस्थापन करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक आनंद नाईक, साईप्रसाद पंडित, शैलेश गावडे, मेधा मयेकर, रवी पाटकर, अमर धोंड, संतोष सावंत, प्रवीण तुयेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी दूर्वा जामसंडेकर व आभार प्रदर्शन संघराज जाधव यांनी केले.