जागतिक टपाल दिनानिमित्त भाजपाच्या वतीने पोस्टमनचा सत्कार.
वेंगुर्ला
जागतिक टपाल दिन दरवर्षी 9 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. टेलिफोन आणि मोबाईल अस्तित्वात येण्याच्या आधीपासून टपाल सेवा अस्तित्वात आहे. टपाल सेवेला मोठा इतिहास आहे.
ब्रिटिश काळापासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोचलेले आहे. आजच्या एसएमएस, वॉट्सॲप, ई-मेलच्या जमान्यातही टपाल यंत्रणा अन् पोस्टमनकाका आजही लोकांच्या मनात पाय रोवून उभे आहेत. टपाल खात्याची नियमितता, अचूकता, कार्यप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्ह आहे, यात लोकांच्या मनात कोणतीच शंका नाही. पोस्टमन उन पावसाची तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजनांनी पाठवलेले साधं पत्र असो वा स्पीड पोस्ट वा रजिस्टर पार्सल असो पण प्रत्येकाच्या घरात प्रामाणिकपणे पोहोचवणारा हक्काचा जिव्हाळ्याचा माणूस म्हणजे पोस्टमन असतो.
देशात 1 एप्रिल 1854 रोजी टपाल सेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून देशाच्या कानाकोपऱ्यात संदेशाचे वहन करण्यात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्मार्ट मोबाईल, इंटरनेट अशा वेगवान संदेशवहनाच्या काळात टपाल खात्याने महत्त्व टिकवून ठेवले आहे. टपाल विभागाने देखील आपल्या सेवेत अमूलाग्र बदल केला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर याच्या हस्ते प्रकाश गावडे - पोस्ट मास्तर, प्रवीण मुकाडे - डाक सहाय्यक, मकरंद खानोलकर -डाक सहाय्यक, पी. अनिल - डाक सहाय्यक, राजेंद्र निनावे - पोस्टमन, वैभव इवनाने पोस्टमन, भाग्यश्री सावंत- पोस्टमन, शैलेंद्र मेस्त्री -पोस्ट मन, गौरेश पार्लेकर-पोस्टमन, राजन पालकर -पोस्टमन, ओमकार मोर्डेकर -MTS, संपदा राऊळ -पोस्ट मन, धोंडू सावंत - पोस्टमन, भिकाजी करंगुटकर -पोस्टमन इत्यादिंचा सत्कार करण्यात आला.