वेंगुर्ला येथील तुळस गावात १५ जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला
वेताळ प्रतिष्ठान तुळस यांच्या वतीने आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने १५ जूनला सकाळी ९ वाजता श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी महेश राऊळ ९४०५९३३९१२ यांच्याशी संपर्क साधावा.