कुडाळ तालुक्यातील पाट गावात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुडाळ तालुक्यातील पाट गावात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

 


कुडाळ

 

       जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील पाट गावातील तलावाजवळील पाणथळ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. वनशक्ती, पाट-परबवाडा ग्रामपंचायत आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय (कुडाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाला ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. परब, डॉ. योगेश कोळी, वनशक्तीच्या करिश्मा मोहिते तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. स्थानिक व जंगली वृक्षप्रजातींना प्राधान्य देत पिंपळ, आंबा, कोकम, जंगली फणस, जंगली जांभुळ, सुरंगी, कडुलिंब व जंगली बदाम इत्यादी ५३ झाडांची लागवड यावेळी करण्यात आली. प्रा. डॉ. योगेश कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाणथळ परिसंस्थांचे जैवविविधतेतील योगदान, हवामान बदलावरील प्रभाव आणि स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन याविषयी माहिती दिली. “पाणथळे ही जैवविविधतेची उगमस्थाने असून त्यांचे संरक्षण अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले. सरपंच सौ. परब यांनी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक सहभाग आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन यामुळेच हे उपक्रम यशस्वी ठरतात, असे त्यांनी नमूद केले.