वेंगुर्ला येथील राष्टीय लोकअदालतीमध्ये ३० प्रकरणे निकाली.

वेंगुर्ला येथील राष्टीय लोकअदालतीमध्ये ३० प्रकरणे निकाली.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला दिवाणी न्यायालय येथे आज दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या राष्टीय लोक अदालतीमध्ये वेंगुर्ला तालुक्यांतील दिवाणी कडील ०१ प्रकरण, फौजदारी कडील ९ प्रकरणे, विविध बँका व विद्युत विभाग, वेंगुर्ला यांच्याकडील एकुण २० वादपुर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत आली.
    यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपुर्व प्रकरणांतील मिळून एकुण सत्तावन्न हजार एकशे अठावीस मात्र एवढी रक्कम या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वसूल करण्यांत आली. तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार संघटना, वेंगुर्ला यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यांत आले होते.तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला अध्यक्ष, तथा दिवाणी न्यायाधीश डी.वाय. रायरीकर, वकिल एस.जी.ठाकूर, पॅनेल सदस्य, व पक्षकारांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज सुरु करण्यात आले. 
   सदरच्या लोकअदालतीमध्ये पॅनेल प्रमुख म्हणून डी. वाय. रायरीकर, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), वेंगुर्ला, व पॅनेल सदस्य म्हणून ॲड.एस.जी.ठाकूर, यांनी काम पाहिले. सदरच्या लोकअदालतीच्या वेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक, श्रीम.एस.एस.कांबळे, व श्री. एस.के.खेडेकर, वकील वर्ग, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.