जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १८ डिसेंबर रोजी आयोजन.
सिंधुदुर्ग.
डिसेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्कांचे व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी / तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत दालन क्र. 106,ए-ब्लॉक, मळमजला सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करुन घ्यावेत. अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुण्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.