खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.
खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला.

   बॅ.बाळासाहेब खर्डेकर महावि‌द्यालयात तृतीयवर्ष कला वाणिज्य व विज्ञान या विद्यार्थ्यांचा जिमखाना विभागाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या डॉ.संगीता अतुल मुळे. मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. सुभाष विलीग, महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले कला विभागाचे प्रमुख प्रा.वामन गावडे.सायन्स विभाग प्रमुख प्रा.एस.एस. चमणकर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एम.आर. नवात्रे.उपस्थित होते.
  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यांनतर महाविद्यालया तर्फे डॉ.संगीता मुळे यांचा सामाजिक कार्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कॉलेज मधून बाहेर जाताना आयुष्यात अनुभवाचे वादळ तयार होणे सुरु होते. उत्साही व्यक्तिमत्व असणाऱ्या गुरुजनांकडून मायेची सावली व भरभरुन अनुभवाची शिदोरी मिळाली आहे.जगाच्या जबाबदारीचा मान स्वीकारावा लागणार आहे.महावि‌द्यालयातील उमटलेल्या पाऊलखुणा तशाच राहू द्या. असे विदयार्थी प्रतिनिधी सचिव फाल्गुनी नार्वेकर हिने याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
  आपल्या विषयात ग्रहण केलेल्या ज्ञानात आणखी भर घाला. समाजातील चांगले नागरिक बना. सुखमय व सुखकर जीवन जगा. असे स्टाफ सेक्रेटरी प्रा.वामन गावडे. यांनी यावेळी म्हटले.
  आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.संगीता अतुल मुळे (वेंगुर्ला) स्त्रीरोग तज्ञ यांनी आजचा दिवस भावूक कडू गोड आहे. सुरवंटाचे झाले पाखरू उंच लागले भरारु असा आहे जीवन कल्पक करण्यासाठी तंत्रज्ञान अवगत करा त्याचा योग्य वापर करा नवनिर्मिती करताना अडचणी व चढउतार येतात. संयम ठेवा अपयशाने खचून न जाता ध्येय साध्य करा. उज्ज्वल भविष्यासाठी समाजाशी बांधिलकी ठेवून आवडणाऱ्या गोष्टी मध्ये करिअर करा. असे विदयार्थ्यांना प्रोत्साहित केले.
   आजचा कार्यक्रम हो विदयार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणारा कार्यक्रम आहे.पुढील वेगळया टप्प्यात प्रवास करावयाचा आहे. शिक्षण थांबत नाही. नोकरी व व्यवसाय करताना कौशल्य असणे आवश्यक आहे. जबाबदारी येणार आहे. कष्ट करण्याची तयारी ठेवा. कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. आईवडिलांकडे लक्ष ठेवून त्याची काळजी घ्या. ज्यांनी पाठबळ दिले त्यांचे ऋण देणे आहे. व्यसनापासून दूर राहा. असे सिंधुदुर्ग उपकेंद्र मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालक मा. डॉ. सुभाष विलींग यांनी याप्रसंगी केले.
   आजचा कार्यक्रम हा सदिच्छा कार्यक्रम असून ज्ञानाला तडा देऊ नका. ज्ञान वाया घालवू नका. ज्ञान मिळवण्याचे थांबू नका. शिकत राहा. ज्ञान दुसऱ्याला समाज घडविण्यासाठी ज्ञानाचा वापर करा. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी. चौगले यांनी प्रतिपादन केले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक यांनी केले.या कार्यक्रमाला संस्थाप्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण प्रा.बी.जी. गायकवाड डॉ. मनिषा मुजुमदार प्रा. विवेक चव्हाण प्रा.एल.बी.नैताम, प्रा.सचिन परुळकर, प्रा.जी.पी.धुरी, प्रा.राजाराम चौगले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.