पंढरपुर येथे वारकरी भवन उभारणार - मंत्री नितेश राणे

पंढरपुर येथे वारकरी भवन उभारणार - मंत्री नितेश राणे


राजापूर 

महाराष्ट्र राज्याचे मत्स व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी राजापूर शहरानजीच्या शीळ गावी वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट दिली.वारकरी आपल्या वाणीतून समाज प्रबोधन समाजाला आकार देण्याचं काम करत असतात. आज आपल्या देशामध्ये  चारी बाजूने इस्लामिक आक्रमण होताना दिसत आहे अशावेळी  हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून आपण करावे असे आवाहन राज्याचे व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शिळ तालुका राजापूर  येथे केले.यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी  मधून जे वारकरी वारकरी भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात त्यांच्या पंढरपूर येथे निवासाची सोय व्हावी म्हणून वारकरी भवन बांधण्याचे आश्वासन श्री राणे यांनी यावेळी दिले.भाजपाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आणि राजापूर तालुका वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर यांच्या पुढाकारातून गेली तीन वर्षांपासून मौजे शीळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.प. सद्गुरू विश्वनाथ तथा भाई महाराज गोसावी यांचे अध्यात्मिक प्रवचन पार पडले.यावेळी आमदार किरण सामंत, राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेक, सरपंच अशोक पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर, नामदेव नागरेकर, गोपाळ गोंडाळ, सुरेश बाईत आदी उपस्थित होते.