वेंगुर्ले येथे विशाल परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत हस्तकला प्रशिक्षण शिबिर

वेंगुर्ले येथे विशाल परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत हस्तकला प्रशिक्षण शिबिर

 

वेंगुर्ले

 

     महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून आत्मनिर्भर बनविण्यासाठी वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा यांच्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी ३, ४ व ५ नोव्हेंबर ला दुपारी ३ ते ६ या वेळेत साई मंगल कार्यालय, एस टी स्टॅण्ड नजीक, वेंगुर्ले येथे हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर भाजपा युवा नेते विशाल परब यांनी पुरस्कृत केले आहे.
         उमा इन्स्टिट्यूट, चिपळूणच्या संचालिका सौ. उमा म्हाडदळकर महिलांना विविध कला प्रकार शिकवणार आहेत. यात मोत्यांचे दागिने, फॅब्रिक दागिने, काथ्याच्या दोरीपासून शोभेच्या वस्तू, मॅट रांगोळी यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाचे खास आकर्षण म्हणजे सध्या फॅशनच्या दुनियेत ट्रेंड असलेला सब्यासाची ब्लाउज शिवणकाम शिकवले जाणार आहे. या शिबिरात सहभागी महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शनही केले जाणार आहे. भाजपा महिला मोर्चाच्यावतीने वेंगुर्लेतील जास्तीत-जास्त महिलांनी या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.