मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मदर तेरेसा स्कूलचा अनोखा उपक्रम वेंगुर्ल्यात बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा.
वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये दि 29 व 30 नोव्हेंबर या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश राठोड व बेनिता डिसोझा मॅडम उपस्थित होत्या. तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप भोसले सर यांनी आनंद मेळावा संदर्भात सांगितले की विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे तसेच देवाण-घेवाण नफा- तोटा, विविध वस्तूंची ओळख, गर्दीतील धाडस, बोलण्याची पद्धत, पैशाची ओळख, पैशाचा हिशोब, धाडस व संयम इत्यादी गुण यामधून घेता येतात. दुसऱ्या दिवशी अध्यक्षस्थानी श्री. जगन्नाथ दाभोलकर, कॉन्ट्रॅक्टर , सौ.राखी दाभोलकर, सौ. संगीता कुबल सिनिअर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर नगरपरिषद वेंगुर्ला
उपस्थित होत्या. यावेळी श्री. दाभोलकर यांनी शाळेतील शिस्तीच महत्व सांगितलं. आनंद मेळाव्यात सोलो डान्स, ग्रुप डान्स, एकांकिका, नाटके गाणी अशा बऱ्याच कार्यक्रमांची मेजवानी होतीच, त्याचबरोबर शिक्षक पालक विद्यार्थी सहकार्यातून खाण्याचे विविध स्टॉल, गेम स्टॉल यावर सर्वजण खाण्याचा न खेळण्याचा आनंद लुटत होते. मदर तेरेसा स्कूल मैदानात आनंदी आनंद सगळीकडे दिसून येत होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.