वेंगुर्लेत ५ मार्च रोजी पाककला व रिल स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे बुधवार दि. 5 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता गृहिणींसाठी भरपूर मनोरंजन असलेले मी गृहिता अंतर्गत विविध खेळ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण रिल्स स्पर्धा व पाककला स्पर्धा यांचे आयोजन वेंगुर्ले भटवाडी येथील श्री देव विश्वेश्वर सांब सदाशिव देवस्थान येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमात गृहिणींसाठी भरपूर मनोरंजन, स्पॉट गेम्स, कर्तबगार गृहिणींचा सन्मान, फनी गेम्स यांचा समावेश आहे. मी गृहिता २०२५ यासाठी प्रथम क्रमांकास रिफ्रिजेटर, व्दितीय क्रमांकास एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांकास एक्वा फिल्टर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.यातील पाककला स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या गृहिणींनी महाराष्ट्रातील विविध पारंपारीक खाद्य पदार्थाला नाविण्यपूर्ण स्वरूप देऊन पारंपारिकतेतून आधुनिक संकल्पना निर्माण करणारे खाद्यपदार्थ बनविणे अपेक्षित आहे. या पाककला स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे रु. 2,500/-, रु.1,500/-, रु.1,000/- अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.तसेच प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिल्स स्पर्धा होत आहे. यात मी गृहिता एक स्त्री, महिला/गृहिणी यांनी आपल्या दृष्टीकोनातून गृहितांच्या दैनंदिन कामकाज व सर्व क्षेत्रातील सहभाग यावर रिल्स तयार करणे अपेक्षित आहे. या स्पर्धेतील प्रथम 5 क्रमांकाना रोख बक्षीस दिले जाणार आहे. या दोन्ही स्पर्धात सहभागी होणाऱ्या गृहिणी व महिलांनी आपली नाव नोंदणी सोमवार दि. 3 मार्चपर्यंतच 9049316800 /9373529571/ 890444665 या मोबाईल नंबरवर करावी.रिल स्पर्धेत सहभाग घेत असलेल्या रिल्समध्ये 'गृहिता' या शब्दाशी संबंधित असावा म्हणजे घर, घरातील कामे, घराचे महत्त्व, घरातील सुख, परिवार, उत्तम संदेश, कौशल्य, स्त्रियांचा सामाजिक क्षेत्रातील वावर इत्यादी तसेच आपल्या रिलमध्ये गृहिता स्पर्धा 2025 या हॅशटॅगचा वापर करावा, व्हिडीओचा कालावधी रिल चा कालावधी 15 ते 30 सेकंद असावा, रिल तयार करताना प्रामाणिकपणा आणि क्रिएटिविटी महत्त्वाची आहे. दर्शकांना घराच्या एका सुंदर, भावनिक किंवा प्रेरणादायक बाजूचा अनुभव द्यावा. अशा प्रकारे रिल ची रचनासंस्था असावी.या स्पर्धेत गृहितांच्या दैनंदिन कामकाज व सर्व क्षेत्रातील सहभाग यावर रिडल्स तयार करण्याची संधी देण्यात आली आहे.या नाविन्यपूर्ण स्पर्धेत तसेच महिलांसाठीच्या विविध खेळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त गृहिणी व महिलांनी सहभागी व्हावे. असे आवाहन गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.