सिंधुदुर्गचे सुपुत्र अनिल घाटे यांना राज्यस्तरीय फिदा कुरेशी पुरस्काराने सन्मानित.

सिंधुदुर्गचे सुपुत्र अनिल घाटे यांना राज्यस्तरीय फिदा कुरेशी पुरस्काराने सन्मानित.

मालवण.

     सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ कबड्डीपटू, ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक तसेच महाराष्ट्राच्या कबड्डी करता गौरवास्पद कार्य करणारे अनिल घाटे यांना नुकताच राज्यस्तरीय फिदा कुरेशी पुरस्कार ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांचा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त किशोर, कुमार व खुला गट, राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची शिष्यवृत्ती तसेच महाराष्ट्राच्या करिता गौरवास्पद कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येतो. 
    यावर्षीपासून प्रथमच फिदा कुरेशी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक असा राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई शहर कडून कबड्डीसाठी भरीव योगदान देणारे सिंधुदुर्ग चे सुपुत्र अनिल घाटे यांना मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर, रायगडचे खासदार सुनील तटकरे, ठाण्याचे खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
     यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह बाबुराव चांदोर, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, राजेंद्र महाजन, सौ. अनिता घाटे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अपर्णा घाटे, सुभाष हरचेकर, राजेंद्र काळोखे, शरद चव्हाण, सुरेश मापुस्कर, मंगल पांडे, राजेंद्र काळोखे, सुरज कदम, इकबाल जमादार, आकाश शिंदे, हरजीत सिंग कौर, आदित्य शिंदे, सलोनी गजमल, नयन सडविलकर पांडुरंग धावडे, मदन चौधरी, बबन होळकर, चैताराम पवार, वसंत मांजरेकर, प्रकाश रेडेकर, विलास शिंदे, शंकर बुडे, रोहिणी अरगडे शहाजान शेख, रतन पाटील, धर्मा सावंत, किरण भोसेकर, रघुनंदन भट, लीला पाटील कोरगावकर, वनिता पाटील, नीलिमा साने दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
   अनिल घाटे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा हे  मूळ गाव असून आज पर्यंत त्यांना विविध जिल्हा, राज्यस्तरीय कबड्डी मधील योगदानाबद्दल विविध  पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये ही त्यांचे योगदान मोठे आहे. अनेक जिल्हा, राज्यस्तरीय, नॅशनल कबड्डी खेळाडू घडविण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. गेली अनेक वर्ष अनिल घाटे यांनी कबड्डी खेळाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात केला असून कबड्डीसाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. मुंबई येथे अनेक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी कबड्डीची सेवा अविरत सुरू ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कबड्डी खेळासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे.
   यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्कारास उत्तर देताना अनिल घाटे म्हणालेत यापुढेही कबड्डीसाठी आपण सर्वस्व योगदान देणार असून कबड्डी खेळाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशामध्ये करणार असून आज मला मिळालेला  "फिदा कुरेशी" पुरस्कार हा मला आजपर्यंत  मला सहकार्य करणाऱ्या सर्व स्तरातील सहकाऱ्यांचा आहे.मला मिळालेला पुरस्कार हा माझ्या आजवरच्या कबड्डीसाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे  यासाठी मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि यापुढेही कबड्डीसाठी जे काही चांगले करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. 
     यावेळी कबड्डी क्षेत्रातील तसेच सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर, आणि  महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.विविध मान्यवरांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. यावेळी कबड्डी मधील राज्यभरातील विविध मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.